चला अनुभवुया धम्माल ‘जर्मनी ऑक्टोबर फेस्ट’ची...


मंडळी अगदी साधा प्रश्न.. कोणाकोणाला माहितेय ‘ऑक्टोबर फेस्ट’बद्दल..? या प्रश्नाला फारसे समाधानकारक उत्तर मिळतेच असे नाही. बऱ्याच जणांचा अगदी बेसिक प्रश्न.. ‘कुठे असतो हा फेस्टिव्हल..?’ मध्यंतरी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून जे मित्र, नातेवाईक, ओळखीचे भेटत होते, त्यांना मुद्दामच हा प्रश्न विचारला. म्हटलं.. पाहुया तरी काय माहिती आहे या ‘ऑक्टोबर फेस्ट’बद्दल.. पण प्रत्येकाकडे वेगवेगळी माहिती होती. मग ठरवलं.. अगदी सखोल ज्ञान नाही तरी, काही गोष्टी गरजेपुरत्या का होईना, माहीत असायला हव्या. प्रामुख्याने जेव्हा आपण देश-विदेशाच्या पर्यटनाला बाहेर पडतो, तेव्हा तर त्या संबंधित ठिकाणाची जुजबी माहिती असणे कधीही उत्तम. म्हणूनच यासंबंधी मला जे माहीत आहे, ते तुमच्या सोबत शेअर करतोय. तर मंडळी आता केवळ दिड महिन्यावर ‘ऑक्टोबर फेस्ट’ येऊन ठेपलाय आणि हा केवळ स्थानिक पातळीवरील इव्हेंट नसून आता ग्लोबल इव्हेंट झालाय. अगदी जर्मनीच्या पर्यटनाला मिळालेला एक नवा आयामच. मग.. आता तुमचीही उत्सुकता वाढतेय ना.. चला तर या फेस्टिव्हल विषयी आणि यानिमित्ताने जर्मनीच्या मस्त वेगळ्या सहलीविषयी जाणून घेऊ.


आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या युरोपच्या केंद्रस्थानी असलेला जर्मनी हा देश. इतिहासातील दोन महायुद्धे, त्यानंतर