अरोरा बोरायलीस किंवा नॉर्दन लाईट्स - निसर्गनिर्मित प्रकाशाचा अद्भूत खेळ

पृथ्वीच्या अतिउत्तरीय भागात आर्क्टिक वृत्ताच्या जवळ आकाशात अनेकदा रंगीबेरंगी प्रकाशझोतांचा एक अनोखा खेळ पहायला मिळतो. उत्तर गोलार्धातील हिवाळ्यात हमखास हा खेळ आकाशात रंगतो. या काळात सूर्याचं दक्षिणायन सुरू असल्याने उत्तर गोलार्धात दिवस लहान असतो. अतिउत्तरीय भागात तर तो आणखीनच लहान असतो. साधारण पणे ५, ६ तासांचा दिवस बाकी १८ तासांची अंधारी रात्र. याच काळात जास्तीत जास्त वेळ अंधार असल्याने अरोरा बोरायलीस सहज दिसू शकतात. त्यांना नॉर्दन लाईट्स किंवा नॉर्डिक डान्सीग लाईट्स असेही म्हणतात.

कसे तयार होतात हे अरोराज्…