‘इंतियामात्कात’ विषयी थोडेसे...


‘इंतियामात्कात’ ही टूर कंपनी चालविणारे हेरंब कुलकर्णी हे मूळचे पुण्याचे रहिवासी. मात्र जवळपास १५ वर्षांपुर्वी ते फिनलंड या देशात स्थायीक झाले. पेशाने इंजिनीअर असलेल्या हेरंब यांनी नोकिया कंपनीत काही काळ उच्च पदावर नोकरी केली, त्यानंतर अन्य काही टेक्नो कंपन्यांमध्येही त्यांनी नोकरी केली. त्यादरम्यान फिनलंड सह स्विडन, नॉर्वे, डेन्मार्क आणि अन्य दक्षिण युरोपीयन देशांमध्ये ते खुप फिरले. तेथील अनेक भागांची त्यांना इत्यंभूत माहिती आहे. स्कँडिनेव्हियन देशांतील विविध माहितीचा, संस्कृतींचा तर खजिनाच जणू त्यांच्याकडे आहे. अखेरीस २०११ सालापासून त्यांनी ‘इंतियामात्कात’ नावाने टूर कंपनी सुरू केली.

‘इंतिया’ म्हणजे इंडिया. ‘इंतिया’ हा फिनिश भाषेतील शब्द आहे. तर, ‘मात्कात’ म्हणजे एखाद्या प्रदेशाची भटकंती करत, त्यावि