top of page

ह्या वर्षीची महाआरती ( थेट प्रक्षेपण - Live ) २ सप्टेंबर १७ 

गणपतीबाप्पाची आरतीही आता होतीये ‘ग्लोबल’ 

यंदाच्या वर्षी देखील हाच उपक्रम पार पडणार आहे २ सप्टेंबर २०१७ रोजी, शनिवारी . यंदाही या उपक्रमात ३० हून अधिक देश आणि ८०० हून आणि गणेशभक्त सहभागी होण्याचा अंदाज आहे. 

गणपती, नवरात्री यांसारख्या पारंपरिक उत्सवांतून आरती या प्रकाराचे नेहमीच अप्रुप असते. पुर्वीच्या काळी सर्वांना एकत्र आणून सामाजिक बांधीलकीच्या नात्याने या उत्सवांना सुरुवात झाली. सामूहिक गणेश मंडळे किंवा नवरात्रात देवीची मंडळे या ठिकाणी फार पुर्वीपासूनच आसपासच्या लोकांनी एकत्र येवून सकाळी व सायंकाळी आरती करण्याची प्रथा होती. ती आजही आहेच. पुढे पुढे मग.. सोसायट्या, नगरं, विविध संस्था आदींचेही स्वत:चे गणपती बसू लागले. मग त्यांच्याही आरत्या सुरू झाल्या. पुढे काळाच्या आणि सामाजिक बदलांच्या ओघात माणसे दुरावत गेली. एकेकाळी कायमस्वरुपी नांदणारी एकत्र कुटूंब हळूहळू केवळ सणांच्या निमित्ताने एकत्र येऊ लागली. बाकी एरवी प्रत्येकाचा वेगळा घरोबा.   

 

आता एकविसाव्या शतकात त्यातही या तंत्रज्ञानाच्या युगात माणूस माणसापासून आणखीनच दुरावत चाललाय. सणासुदीलाही हल्ली दोन किंवा तीन व्यक्तीच घराघरांत पहायला मिळतात. त्यानिमित्ताने देखील कोणी कोणाकडे जात नाही. मग घरातील देवाच्या आरतीला पुर्वीसारखा माणसांचा समुह कोठून असणार.. त्या आरतीची मजा आजचे तरुण, नागरीक कशी काय अनुभवणार.. प्रत्येकजण आपल्याच नादात आणि व्यापात. सोशल मीडियाने गेल्या काही वर्षांत आपल्या मनावर, कामावर, शरीरावर आणि वागणुकीवरही जे काही गारुड केलंय.. ते पाहता नजीकच्या भविष्यात माणूस माणसाशी थेट संवाद साधेल की नाही हे खरंच सांगता येत नाही. फेसबूक, ट्विटर वरुन लांबच्या माणसांसोबत संवाद साधता साधता जवळच्यांकडे मात्र दुर्लक्ष अशी सध्याची गत आहे. 

 

बहुतांश भारतीय आज परदेशांत स्थायीक आहेत. सर्वच जण २४ तास आपल्याच कामात बुडालेला आहे. सण वगैरे तर सोडूनच द्या.. पण वर्षातून एकदा साधी सुटी घेऊन आपल्या देशात यायचे म्हटले तरी मुश्कील. पण जसे तंत्रज्ञानाचे अनेक तोटे, दुरुपयोग समोर येतात किंवा आले तसेच त्याचे काही चांगले उपयोगही करता येतात. आणि तसे काहींनी सिद्ध केले आहे. 

भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडे आठ वाजता ही महाआरती सुरू होईल. ज्या भाविकांना हा सोहळा पाहण्याची उत्सुकता असेल त्यांनी www.intiamatkat.fi  या वेबसाईटला भेट द्यावी. तसेच महाआरतीच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी श्री हेरंब कुलकर्णी यांना पुढील इ-मेलवर संपर्क करावा. वरील वेबसाईटवर उपलब्ध फॉर्म भरुन तो सबमीट करावा. त्याप्रमाणे आपल्यास महाआरतीत वेळ दिण्यात येईल.  इंतियामातकात टूर्स अँड ट्रॅव्हल्स या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.

 

संपर्कासाठी इ मेल  -  heramb@intiamatkat.fi

 

असे असते या महाआरतीचे स्वरुप :

 

यामध्ये सदर देशांतील महाराष्ट्र मंडळेही सहभागी होतात हे विशेष. त्यांच्या कार्यालयात किंवा कोणा एकाच्या घरी तांत्रिकदृष्ट्या संपन्न अशी व्यवस्था केली जाते. एकाच वेळी किती ठिकाणहून किती नागरीक सहभागी झाले आहेत, ते मोठ्या स्क्रीन वर पाहण्याची सुविधा उपलब्ध असते. 

 

फिनलंड हा यजमान देश असल्याने गणपतीची पहिली आरती म्हणण्याचा मान त्यांचा. फिनलंडमधील भाविक आरती म्हणत असताना त्यांची विंडो मोठी तर, अन्य देशांच्या विंडो लहान असतात. त्यानंतर दुर्गे दुर्गट भारी ही आरती पुढचा देश म्हणणार. त्यावेळी त्यांची विंडो मोठी. मग शंकराची आरती तिसरा देश, दत्ताची आरती चौथा देश .. असं करत करत सुमारे १ ते दिड तास ही महाआरती सुरू असते.   

 

गत वर्षीची महाआरती :

 

सोहळ्यातील एकूण सहभागी देश - १५  ( फिनलंड, डेन्मार्क, नेदरलँड, जर्मनी, भारत, अमेरिका, ब्रिटन, नॉर्वे, स्विडन, रशिया आदी )

प्रत्यक्ष आरतीत सहभागी देश - ८

आरतीचे प्रक्षेपण झालेले देश - २३

नेटवर थेट प्रक्षेपण पाहणारे भक्तगण - १२,३४५ नागरीक

गेल्या काही वर्षांपासून परदेशस्थ मंडळींनी आपापल्या देशांतच विविध भारतीय सण साजरे करण्यास सुरुवात केली. त्यानिमित्ताने तेथील अन्य भारतीय मित्रमंडळी, नातेवाईक एकमेकांकडे जाऊ लागले. गणपती सणाच्या निमित्ताने अगदी फराळाच्या पदार्थांपासून ते गणेश मूर्ती पर्यंत सारे काही भारतातून परदेशात जाऊ लागले. सध्या तर त्याला विशेष बिजनेसचे स्वरुप आले आहे. मग त्यानिमित्ताने आपल्याप्रमाणे तिकडेही घरोघरी मोठ्या प्रमाणात गणेश आरत्या सुरू झाल्या. अगदी रोज नाही पण सणाच्या १० दिवसांपैकी किमान सुटीचा एक दिवस सर्व मंडळी एकत्र येऊन आरतीचा आनंद घेतात. त्यानंतर महाप्रसाद. आपल्याकडे हल्ली कमी होत जाणारी ही प्रथा परदेशात मात्र आता चांगली रुजतेय.  

 

त्यातही गेली काही वर्ष आणखी एका नव्या उपक्रमाची भर पडली. मुळचे पुण्यातील रहिवासी असलेले व सध्या फिनंलड देशात स्थायीक असलेले सॉफ्टवेअर इंजिनिअर श्री. हेरंब कुलकर्णी यांनी २०१२ या वर्षी गणेश ग्लोबल महाआरती हा उपक्रम सुरू केला. त्यासाठी त्यांनी संपूर्ण युरोपातील त्यांच्या नेटवर्कमधील भारतीयांशी संपर्क साधला. त्यानुसार युरोपातील विविध देशांतील भारतीयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यावर सर्वांच्या सोयीने ( विविध टाईम झोन्सचा विचार करुन ) एक वेळ ठरवण्यात आली. त्या ठरलेल्या वेळेवर महाआरतीला सुरुवात करुन सर्वांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून ती लाईव्ह उपल्बध करुन देण्यात आली. फिनलंड देशातील भारतीय हेरंब यांच्या घरीच उपस्थित होते. तर अन्य देशांतील नागरिकांना वेळ पाळत त्यामध्ये सहभागी होण्याची किमया केली. आठ देशांतील भारतीयांनी यात सहभाग नोंदवला. 

 

यंदाच्या वर्षी देखील हाच उपक्रम पार पडणार आहे २ सप्टेंबर २०१७ रोजी,शनिवारी . यंदाही या उपक्रमात ३० हून अधिक देश आणि ८०० हून आणि गणेशभक्त सहभागी होण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने स्कँडिनेव्हियन आणि युरोपीय देशांतील भक्तगण या गणेश ग्लोबल महाआरतीसाठी एकत्र येतात. या वर्षी फिनलंडच्या वेळेनुसार सायंकाळी ६ वाजता ही महाआरती सुरू होईल. मध्य युरोपीय देशांच्या टाईम झोननुसार ही वेळ सायंकाळी ५ असेल. तर, पुर्वेचे आणि अति पश्चिमेचे देश त्यांची योग्य वेळ जमवून या आरतीसाठी तयार राहतील. सुरूवातीला अथर्वशीर्ष, प्रणम्य शिर्षादेवं.. आदी स्तोत्रे म्हटली जातील. 

गत वर्षीची महाआरती 

Watch Live
bottom of page